चलनातुन रदद झालेल्या नोटा बाळगल्या बाबत दोन गुन्हे दाखल

चलनातुन रदद झालेल्या नोटा बाळगल्या बाबत दोन गुन्हे दाखल

उदगीर ( प्रतिनिधी ) : शहर पोलीस ठाणेस दिनांक २०/०१/२०२१ रोजी दाखल गु.र.क. १५/२०२१ हया दाखल गुन्हयामधील अटक आरोपीतांकडे चौकशी करून पोलीसांचा तपास सुरू आहे. सदर तपासामध्ये पोलीसांना माहिती मिळाली की, नमुद गुन्हयातील संशयीत अटक आरोपी मुसा हन्नु बागवान रा. खैरनगर उदगीर याने त्याच्याकडे चलनातून रदद झालेल्या नोटा बाळगल्या आहेत. त्यावर पोलीसांनी अधिक तपास केला असता मुसा हन्नु बागवान याचेकडे १००० रू. दराच्या एकूण ९५६ नोटा अशा ९ लाख ५६ हजार रूपये स्वत:च्या कब्जात बेकायदेशीर पणे बाळगले असल्याचे निष्पन्न झाले, त्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे मुसा हन्नु बागवान या इसमावर गुन्हा नोंद क. ४१/२०२१कलम ५, ७ दि स्पेसिफाईड बँक नोटस (सेशन ऑफ लायबलीटीज) अॅक्ट २०१७ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे व सदरच्या नोटा पोलीसांनी तपासकामी जप्त केलेल्या आहेत.

तसेच दिनांक २०/०१/२०२१रोजी लातुर शहर पोलीसांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी मौजे बनसावरगाव ता. चाकूर जि. लातूर येथे राहणारा इसम नामे अजित घंटेवाड याच्या राहत्या घरी जावून त्याच्याकडे विचारपुस केली, तेव्हा त्याच्याक डे भारतीय चलनातून बंद झालेल्या १०००रु. दराच्या एकूण ६४४ नोटा तसेच ५००रु. दराच्या एकूण ५ नोटा अशी एकूण रक्कम ६ लाख ४६ हजार पाचशे रूपये मिळून आली. सदर रक्कम पोलीसांनी पुढील तपासासाठी जप्त केली. तसेच सदर रकमेबाबत पोलीसांनी इसम नामे अजित जनार्दन घंटेवाड वय- २६ वर्षे याच्याकडे अधिक चौकशी केली असता नमुद चलनातुन बाद झालेल्या नोटा बाळगण्यामध्ये इसम नामे १) लक्ष्मण उर्फ लखन हणमंत यादव वय- २५ वर्षे, रा. कासारजवळा, ता. जि. लातूर २) सचिन प्रदिप नामवाड वय-२८ वर्षे, रा. शिवाजी चौक, जळकोट (३) अविनाश देविदास गायकवाड वय- २८ वर्षे, रा. वहाद ता. कंधार जि. नांदेड ( लातुर येथील एका प्रख्यात संघटनेचा सदस्य) (४) गजानन बाजीराव पप्पलवाड वय-४१ वर्षे, रा. टाकळगाव ता. वसमत जि. हिंगोली यांनी अजित घंटेवाड यास संगणमताने मदत केली असल्याची माहिती समोर आली, त्यावरून वर नमुद सर्वाविरोधात एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे, लातुर येथे गुन्हा नोंद कमांक ७६/२०२१ कलम ५, ७ दि स्पेसिफाईड बँक नोटस (सेशन ऑफ लायबलीटीज) अॅक्ट २०१७ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

About The Author