हिवरा ग्रामपंचायत मध्ये घडून आले परिवर्तन
एकता पॅनलचा दारुण पराभव;आता सरपंच पदाकडे लक्ष
महागाव (राम जाधव) : महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील ग्रामपंचायतीची निवडणूक एकता पॅनल विरुद्ध न्यु परिवर्तन पॅनलमध्ये अटीतटीची लढत झाली. या लढती मध्ये न्यु परिवर्तन पॅनलने 13 जागांपैकी सात जागा जिंकत ग्रामपंचायतची सत्ता हस्तगत केली तर साहेबराव पाटील यांच्या एकता पॅनलला तीन जागेवर समाधान मानावे लागले. तर तीन जागा ह्या अविरोध निवडून आल्या आहेत.यामध्ये न्यु परिवर्तन पॅनलचे प्रमुख व उमेदवार शरद पाटील,सौ.जयश्री विजय कदम,सौ.मेघा शिरीष बोरूळकर,राजू धोतरकर,नितीन कदम व अशोक सूर्यभान कदम यांचा दोन जागेवर विजय झाला तर एकता पॅनलचे उमेदवार सौ मीनाक्षी शिंदे,सौ जयश्री राजेंद्र कदम, सौ अलंकावती कदम यांचा विजय झाला असून सौ अनिता जामकर, सौ संगीता पवार व रमेश भुसारे हे अविरोध निवडून आले असून नव्याने निघणाऱ्या आरक्षण सोडतीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून हिवरा नगरीचा सरपंच कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. तर 30 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदारांनी सत्ता असलेल्या एकता पॅनलला धक्का दिला असून गावात परिवर्तन घडून आणले आहे.माजी जि.प.सदस्य एकता पॅनलचे प्रमुख साहेबराव पाटील यांना आत्मपरीक्षण करून पॅनलची भूमिका व धोरण यामध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकट 1
जनतेने दिलेला जनादेश मला मान्य
जनता जनार्दनांनि मला सलग 30 वर्ष विकास काम करण्याची संधी दिली त्या बद्दल मी कृतज्ञ आहे, आज जो माझा पराभव झाला तो मी स्वीकारतो व निवडुन आलेल्या सर्व उमेदवाराचे अभिनंदन करतो व गावच्या विकासा साठी सदैव कट्टीबद्द राहीन.
साहेबराव पाटील कदम (हिवरेकर )
चौकट 2
मतदारांनी आमच्या न्यु परिवर्तन पॅनलवरती विश्वास टाकून आम्हाला निवडून दिले असून गावच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करून आम्ही गावकऱ्यांना व विरोधकांना सोबत घेऊन आम्ही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहो. तसेच जि प सदस्य विलास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू- शरद पाटील कदम न्यु परिवर्तन पॅनल प्रमुख तथा नवनिर्वाचित सदस्य