नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

महागाव (प्रतिनिधी) : थोरस्वतंत्र सेनानी आणि आझाद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिवरा संगम येथिल ग्रामपंचायत येथे जयंती साजरी करण्यात आली. तर थोर स्वतंत्र सेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस जि.प सदस्य विलास भुसारे व मुकुंद पांडे यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुकुंद पांडे सर , पो. पा. प्रविण कदम पाटील, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, राजू धोतरकर, अशोक पाटील, विजय कदम, सतीश पाटील, किशोर घटोळे, किरण जामकर,पत्रकार भगवान फाळके, राजू गिरी, प्रकाश ठाकरे, बिहारी जयस्वाल, राम जाधव तसेच गावातील नवयुवक व नागरिक उपस्थित होते.

या जयंती कार्यक्रमात जि.प.सदस्य विलास भुसारे यांनी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच देशाप्रती अभिमान ओतप्रोत भरलेल्या नेताजी बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संघटक कौशल्य होते त्यांच्यासारखे महामानव पुन्हा होणे नाही. त्यांनी गोरगरीब जनतेसाठी अनेक कामे केली असून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील असे जि प सदस्य विलास भुसारे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कदम यांनी केले तर आभार जनार्धन राजवाडे यांनी मानले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!