अग्निशामक दलाच्या जवानांनी 70 फूट खोल खाणीत पडलेल्या तरुणाला वाजवले
पुणे (रफिक शेख) : मांजरीला वाचविताना वेताळ टेकडीवरील ७० फूट खोल खाणीत पडलेल्या तरुणाला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. रामदास उभे (वय २४, रा.कोथरूड) असे या तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पायाला फ्रेंक्चर झाले असून, डोक्याला इजा झाली आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी राजेश जगताप यांनी सांगितले की, रामदास उभे हा आपल्या २ बहिणींसह वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला आले होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास टेकडीवरील खाणीच्या वर एका मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल जाऊन तो खाली ७० ते ८० फुट खोल असलेल्या खाणीत पडला. अग्निशामक दलाला सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी याची खबर मिळाल्यावर अग्निशामक दलाचे जवान तातडीने तेथे गेले. मात्र, गाडी खाणीजवळ पोहचू शकत नव्हती. छोट्या गाडीने जवान खाणीजवळ पोहचले. उभे हा खाणीतील झुडपे व पाणी यांच्यामध्ये पडले होते. त्याच्या पायाला इजा झाल्याने ते चालू शकत नव्हते. काही जवान रोपच्या साहाय्याने त्याच्याजवळ पोहचले. खाणीत काही ठिकाणी गुडघ्याभर तर काही ठिकाणी छातीपर्यंत पाणी आहे. काही जवान पाण्यातून तेथपर्यंत गेले. या ठिकाणी १०८ ची रुग्णवाहिकाही आली होती.