विवाहितेची ८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

विवाहितेची ८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे (योगिता कोरे) : लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरले, ते वजन वाढवून आणण्यासाठी तसेच बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, याकारणावरून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने ८ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. कल्याणी प्रधान (वय ३२) असे या विवाहितेचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी अजितकुमार अनंतचरण प्रधान, पद्मावती प्रधान, अनंतचरण प्रधान, अभिमन्यू प्रधान, ममता प्रधान (सर्व रा. काळेपडळ, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाबन किशोरचंद परिडा (वय ४२, रा. ओडिशा) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अजितकुमार याच्यासमवेत फिर्यादी यांची बहीण कल्याणी हिचा जून २०१८ मध्ये विवाह झाला होता. लग्नात दिलेले दागिने कमी वजनाचे भरले आहेत. ते वजन वाढवून आणण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगून त्या कारणावरून तिला शिवीगाळ करून मारहाण केली जात होती.

About The Author