महिलेला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार
पिंपरी (प्रकाश इगवे) : एका विवाहित महिलेला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने या महिलेचे अश्लील फोटो तसेच व्हिडिओ काढले. फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि महिलेच्या पतीला, मुलाला जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली. याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेने गुरुवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मानतेश नाईकोडे (रा. गुलबर्गा, विजापूर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार २०१९ पासून पुढील सहा महिन्यांपर्यंत देहूरोड आणि तळेगाव दाभाडे परिसरात घडला. अधिक • माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घरासमोर चालू असलेल्या बांधकामाच्या स्लॅबवरून फिर्यादीवर पाळत ठेवली. फिर्यादीचा मोबाइल क्रमांक मिळवून त्यांना वारंवार फोन करून जवळीक वाढवली.