पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ५ गाड्याची चोरी

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ५ गाड्याची चोरी

पिंपरी (प्रकाश इगवे) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तानाजी इंदुराव माने (वय ४७, रा. साईनाथनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी दुचाकीची चोरी केली. अमर सदाशिव गोंदुकृपे (वय ३९, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्राची दुचाकी वापरत होते. मंगळवारी (दि. ११) सायंकाळी सहा वाजता दोन चोरट्यांनी माने इंडस्ट्रीज या कंपनीच्या समोरून त्यांची दुचाकीची चोरी केली. समाधान लक्ष्मण सपकाळ (वय २२, रा. झित्राईमळा चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी हॅण्डल लॉक करून घराजवळ पार्क केली होती.

About The Author

error: Content is protected !!