चायनीज खाल्ल्याचे पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण

चायनीज खाल्ल्याचे पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण

पिंपरी (रफिक शेख) : हातगाडीवर चायनिज खाल्ल्यानंतर पैसे न दिल्याने चार जणांनी मिळून एकाला मारहाण केली. अष्टविनायक चौक, टॉवर लाईन चिखली येथे ही घटना मंगळवारी (दि. ११) रात्री आठ वाजता घडली. विलास बिरुणगी असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मलम्माबाई शरणप्पा बिरुणगी (वय ४४, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहित वाबळे आणि त्याचे दोन ते तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author

error: Content is protected !!