नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक

५० हजार रुपयांचा नायलॉन जप्त

पुणे (प्रकाश इगवे) : बोहरी आळीत चोरून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. जुनेद अकबर कोल्हापूरवाला (वय २९, रा. गणेश पेठ) व अदनान असिफअली सय्यद (वय १९, रा. गणेश पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दुकानातून नायलॉन मांजाचे १९ रिळ व रोख रक्कम असा ४९ हजार ९६० रुपयांचा माल जप्त केला आहे. प्लास्टिक, नायलॉन, जवळ बाळगू नये व वापर करताना कोणी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार मीना पिंजण आदींनी केली.

प्लास्टिक, नायलॉन, सिथेटिक मांजाने पक्षी व माणसांना होणाऱ्या इजांपासून संरक्षण व्हावे, यासाठी या मांजाचा वापर करण्यास, जवळ बाळगण्यास बंदी घातली आहे. गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक याबाबत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार मीना पिंजण व रुखसाना नदाफ यांना बोहरी आळीतील दुकानदार चोरून नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुकानात बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन छापा टाकला व नायलॉनचा मांजा जप्त केला.

About The Author