आईने शारीरिक संबंधास दिला नकार; नराधमाने तिच्या मुलीवर केला बलात्कार

आईने शारीरिक संबंधास दिला नकार; नराधमाने तिच्या मुलीवर केला बलात्कार

आरोपीला अटक : तळेगाव दाभाडेतील प्रकार

पिंपरी (रफिक शेख) : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. महिलेने विरोध केला असता तिच्या मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. तळेगाव दाभाडे येथे २०१८ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. वसंत बबन भोगसे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर पीडित फिर्यादी महिला तिच्या मुलीसह राहत असताना आरोपीसोबत तिची ओळख झाली. या ओळखीतून विश्वास संपादन करून आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेसोबत शारीरिक संबंध केले. महिलेने विरोध केला असता त्यांच्या मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

About The Author

error: Content is protected !!