पती-पत्नीमधील भांडणाचा गैरफायदा घेऊन विनयभंग

पती-पत्नीमधील भांडणाचा गैरफायदा घेऊन विनयभंग

पिंपरी (प्रकाश इगवे) : महिलेने तिच्या पतीला घटस्फोट द्यावा म्हणून दबाव आणला. तसेच पती-पत्नीमधील भांडणाचा गैरफायदा घेऊन महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुसगाव (पुणे) येथे ऑक्टोबर २०२० मध्ये ही घटना घडली. संगमेश्वर व्यंकटराव राघोजी (वय ५५, रा. हडपसर, पुणे), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला व तिचा पती यांच्यातील भांडणाचा आरोपीने गैरफायदा घेतला. पती-पत्नीमधील वाद मिटवून देतो, असे सांगून आरोपी हा फिर्यादीच्या घरी वारंवार आला. फिर्यादीशी बोलण्याचा व जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

About The Author

error: Content is protected !!