१ लाख ९४ हजार १२६ रुपयांच्या गुटखा जप्त

१ लाख ९४ हजार १२६ रुपयांच्या गुटखा जप्त

पिंपरी (योगिता कोरे) : शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची साठवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. एक लाख ९४ हजार १२६ रुपयांच्या गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी जप्त केला. हिंजवडी पोलिसांनी शुक्रवारी (दि. १४) दुपारी चारच्या सुमारास शिंदेवस्ती, नेरे (ता. मुळशी) येथे ही कारवाई केली. गोविंद प्रजापती (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार राजेंद्र करणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

About The Author

error: Content is protected !!