अश्लील फोटो पाठवत महिलेला जीवे मारण्याची

अश्लील फोटो पाठवत महिलेला जीवे मारण्याची

पिंपरी (प्रकाश इगवे) : महिलेचा तसेच तिच्या मुलाचा चेहरा असलेले अश्लील फोटो पाठवले. तसेच तिचा विनयभंग केला. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे बुधवारी (दि. १९) दुपारी ही घटना घडली. पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. १९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोबाइलधारक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवर व्हॉट्सअप कॉल केला. तुम्हारे हजबंड कहा पे है, असे फिर्यादीला विचारले. तुमचे काय काम आहे, अशी विचारणा फिर्यादीने केली. तुमचे पती परत आल्यावर कॉल करण्यास सांगा, असे आरोपी म्हणाला, त्यानंतर आरोपीने फिर्यादीचा चेहरा असलेले अश्लील फोटो फिर्यादीच्या मोबाईलवर पाठविले. यामुळे फिर्यादीने आरोपीचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर आरोपीने साधा कॉल केला असता फिर्यादीने तो उचलला नाही.

About The Author

error: Content is protected !!