भावाने बहिणीवर केले कोयत्याने वार

भावाने बहिणीवर केले कोयत्याने वार

पिंपरी (रफिक शेख) : वडिलांनी मुलाकडे त्याच्या आईचे एटीएम कार्ड मागितले. त्याचा राग आल्याने मुलाने त्याच्या बहिणीवर कोयत्याने वार केले. सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलाला अटक केली. पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.१६) रात्री ही घटना घडली.

राजीव रविकर हरकरे (वय ४१, रा. पिंपळे सौदागर), असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रविकर शंकर हरकरे (वय ६९, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक भारत गोसावी तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!