शिरूर अनंतपाळ चा विजय म्हणजे बाळासाहेबांना मानवंदना

शिरूर अनंतपाळ चा विजय म्हणजे बाळासाहेबांना मानवंदना

शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांचे प्रतिपादन

शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. महाविकास आघाडीतून लढवलेल्या पाच पैकी चार जागा निवडून आणून जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देण्याचा यशस्वी प्रयोग झाला. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांतजी खैरे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूरकरर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने व महिला जिल्हा संघटक शोभाताई बेंजरगे, तालुकाप्रमुख भागवत वंगे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. या यशामुळे लातूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचे मनोधैर्य उंचावले असून लातूर जिल्ह्यात झिरो असलेली शिवसेना भविष्यात हिरो करण्याचे त्यांचे स्वप्न साकार होणार अशी अपेक्षा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी व्यक्त केली. भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगरपालिका निवडुकीत शिवसेनेला चांगले यश मिळेल आणि जिल्ह्यातील शिवसेनेला चांगले दिवस येतील हे नक्की. निवडणुकीत मिळालेला विजय हा शिवसेनाप्रमुख वंदणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरणार आहे.

About The Author

error: Content is protected !!