राहिलेला विमा आठ दिवसात द्या; शेतकरी संघटना

राहिलेला विमा आठ दिवसात द्या; शेतकरी संघटना

औसा (प्रतिनिधी) : या वर्षीचा खरीप पिक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना निवेदन देऊन आठ दिवसात विमा खात्यात जमा न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

खरीप २०२१ मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिक विमा भरला आहे. त्यामुळे अतिवृष्टी व आवर्षणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातचा घास निसर्गाने घालवला आहे. त्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणे चालू आहे.परंतू अद्यापही त्याच गावातील, त्याच गटातील काही शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी चौकशी केली असता विमा प्रतिनिधी त्यांना तारीख पे तारीख देत आहेत. म्हणून आज शेतकरी संघटनेने आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करावी अन्यथा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, नेते कल्याण हूरदळे, अंतराम मुस्के, दत्ता भोसले आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

About The Author