दयानंद कला महाविद्यालयात मतदार जनजागृती निमित्ताने ऑनलाईन वकृत्व स्पर्धांचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील वाद-विवाद वकृत्व मंडळाच्या वतीने दि. 19 जानेवारी रोजी मतदार जनजागृती दिनानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात ‘सदृढ लोकशाही आणि जागरूक मतदार’ या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात 31 विद्यार्थ्यांनी या विषयावर ऑनलाईन मनोगते व्यक्त केली. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मतदान हा आपला मूलभूत हक्क असून त्याची अंमलबजावणी प्रत्येक भारतीय नागरिकांनी करावी असे आव्हान केले. मतदानाच्या माध्यमातून आपल्या हक्कांची व कर्तव्याची अंमलबजावणी केल्यास सुशासन व नागरी प्रशासन निर्माण होण्यास मदत होऊ शकेल असे प्रतिपादन अनेक विद्यार्थ्यांनी या प्रसंगी केले. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयातील वाद-विवाद मंडळाचे प्रमुख डॉ. बालाजी घुटे यांनी केले.
सुदृढ लोकशाही आणि जागरूक मतदार या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांनी असे प्रतिपादन केले की आजचा तरुण युवक हा राज्य अवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे आजचे युग हे तरुणांची युग म्हणून ओळखले जात आहे. तरुणांनी नव्या युगाची सुरुवात करण्याकरिता घटनेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या मतदानाचा हक्क बजावण्यास राष्ट्र निर्मितीमध्ये भरीव कार्य होऊ शकेल असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी दयानंद कला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, प्रा.विवेक झंपले, प्रा. राजकुमार मोरे, प्रा.जिगाजी बुद्रूके, प्रा. महेश जंगापल्ले आदींनी परिश्रम घेतले.