आता मनपा कर्मचार्यांवर ‘हालचाल रजिस्टर’ ची नजर

आता मनपा कर्मचार्यांवर 'हालचाल रजिस्टर' ची नजर

खबरदार परवानगीशिवाय मुख्यालय सोडाल तर

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहर महापालिकेत दररोज शेकडो नागरिक कामानिमित्त येत असतात परंतु प्रत्येक नागरिकांना आपले काम वेळेत होईल, याची खात्री नसते. कारण अधिकारी अथवा कर्मचारी कार्यालयाबाहेर असतात. अशाप्रकारच्या तक्रारी आल्यानंतर आयुक्त अमन मित्तल यांनी दि. 19 जानेवारी वार बुधवारी रोजी दुपारी काही विभागांमध्ये पहाणी केली असता अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी ‘हालचाल रजिस्टर’मध्ये नोंद करुनच कार्यालय सोडावे, अन्यथा कार्यवाही करण्याचे आदेशच काढले आहे.

आयुक्त अमन मित्तल यांनी दि. 19 जानेवारी रोजी मनपा कार्यालयातील विभागात जावून पाहणी केली असता काही कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी गैरहजर आढळले होते. त्यामुळे सर्व विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘हालचाल रजिस्टर’ ठेऊन यामध्ये नोंद केल्याशिवाय विभाग सोडू नये. दररोज कार्यालयीन वेळेनंतर संबंधित विभागप्रमुखांनी हालचाल रजिस्टरवरील नोंदीची पाहणी करुन त्या दिवसाच्या नोंदी अंतिम कराव्यात. ज्यांना कार्यालयीन कामासाठी मुख्यालयाबाहेर जायचे आहे, त्यांनी हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करुन आयुक्तांची मान्यता घेऊनच मुख्यालय सोडावे. तसे न केल्यास संबंधितांवर कार्यालयीन कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

About The Author