अवैध दारू विक्री करणारा सेनेचा स्वयंघोषित पदाधिकारी जोमात, मुरुड पोलीस मात्र कोमात?

अवैध दारू विक्री करणारा सेनेचा स्वयंघोषित पदाधिकारी जोमात, मुरुड पोलीस मात्र कोमात?

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील चाटा, भोयरा या गावाला जाणाऱ्या मार्गावर गेली अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री चा व्यवसाय मोठ्या प्रमाणात खुलेआम चालू आहे. हा व्यवसाय थाटून बरेच दिवसांपासून पोलीसांना गुंगारा देत अवैध दारूची विक्री करणारा सेनेचा तो कोण स्वयंघोषित पदाधिकारी जोमात असुन मुरुड पोलीस मात्र कोमात असल्याची चर्चा परिसरात सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

लातूर तालुक्यातील ग्रामीण मतदारसंघात गेली अनेक वर्षा पासून चाटा, भोयरा, व मुरूडअकोला रेल्वेस्टेशन परिसरात ज्या ठिकाणी तीन पोलीस ठाण्याची हद्द मिळते अशा ठिकाणी अवैध दारू विक्री चा व्यवसाय दिवसाढवळ्या खुलेआम जोरात चालू आहे. विशेषतः मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाटा या गावच्या शिवारात मुख्य रस्त्यावर किराणा दुकान च्या नावाखाली हा अवैध दारू विक्री चा व्यवसाय चालवला जात आहे. या परिसरात अवैध दारू विक्री चा व्यवसाय चालवणारा सेनेचा स्वयंघोषित पदाधिकारी असल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. सत्तेचा रुबाब दाखवत अवैध दारू विक्री चा व्यवसाय करणारा सेनेचा तो कोण ?स्वयंघोषित पदाधिकारी याचा शोध मुरुड पोलीसांनी घेणे गरजेचे आहे.

चाटा, भोयरा या गावाला जोडणार्या मुख्य रस्ता वर मुरुड अकोला रेल्वे स्टेशन च्या बाजूला चाटा शिवारात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम जोरात चालू आहे. सेनेचा तो कोण स्वयंघोषित पदाधिकारी किराणा दुकान च्या नावाखाली एका महिलेच्या माध्यमातून हा व्यवसाय चालवत आहे. मुख्य रस्ता वर खुलेआम दारू विक्री मुळे परिसरातील ये जा करणार्या नागरिकांना प्रवासी, महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. एखाद्या मुख्य रस्ता वर सत्तेच्या नावाखाली अवैध दारू विक्री चा व्यवसाय करणारा सेनेचा स्वयंघोषित पदाधिकारी जोमात तर मुरुड पोलीस मात्र कोमात असल्याचे बोलले जात आहे. वेळी च या अवैध दारू विक्री ला पायबंद घालणे गरजेचे असून सेनेचा तो स्वयंघोषित पदाधिकारी कोण याचा शोध मुरुड पोलीसांनी घेणे गरजेचे आहे. तसेच अवैध दारू विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी त्या परिसरातुन मोठ्या प्रमाणावर होत आहे.

About The Author