शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील गावभाग म्हणून ओळखला जाणारा पटेल चौक येथे शिवसेना व युवासेना शाखेच्या वतीने शिवसैनिकांचे दैवत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 96 व्या जयंती साजरी करत अभिवादन करण्यात आले.

गावभागात छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावभागातील जेष्ठ शिवसैनिक उमाकांत शेडुळे, शाहूराज गाडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ बुरबुरे, रवींद्र सुतार, युवासेना शहर प्रमुख विजय जी थाडगे, अभिजित बंडगर, धीरज कांबळे, निखिल कदम, आशिष सुरवसे, शाम सुतार, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!