स्व.ॲड. नागेशकुमार माने मार्ग नामफलकाचा अनावरण सोहळा संपन्न

स्व.ॲड. नागेशकुमार माने मार्ग नामफलकाचा अनावरण सोहळा संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दि. 23 जानेवारी रोजी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जय भवानी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्व.ॲड.नागेशकुमार माने पथ मार्गचा नामफलक अनावरण सोहळा लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेबजी ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, नगरसेवक राजा मणियार, व्यंकट वाघमारे, शैलेश स्वामी, गीता गौड, विष्णूपंत साठे, शंकर रांजणकर, सुनिल बसपुरे, रमेश माळी व तसेच स्थानिक नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!