स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे योगदान महत्वपूर्ण – प्रा.विलास कोमटवाड

स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे योगदान महत्वपूर्ण - प्रा.विलास कोमटवाड

दयानंद कला महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

लातूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.त्यांचा जन्म ओडिशा मधील कटक येथे 23 जानेवारी 1 897 रोजी झाला. त्यांची 125 वी जयंती आज आपण साजरी करत आहोत. शालेय जीवनापासूनच बुद्धिमान असलेल्या नेताजींनी इंग्लंड मध्ये आयोजित आयसीएस परीक्षा पास होऊन सरकारी सेवेमध्ये रुजू झाले. परंतु राणीच्या एकनिष्ठतेची शपथ नोकरीमध्ये घ्यावी लागत असल्याने त्यांनी नोकरी सोडून आपले जीवन देशसेवेत घालण्याचे ठरवले. त्यानंतर ते भारतीय राजकारणात सक्रिय झाले. असे प्रतिपादन प्रा विलास कोमटवाड यांनी केले. ते दयानंद कला महाविद्यालयात आयोजित नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बोलत होते.

दयानंद कला महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली..या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी गायकवाड, उपप्राचार्य अनिल माळी,डॉ रमेश पारवे, डॉ मच्छिंद्र खंडागळे,डॉ संदीप जगदाळे, डॉ देवेंद्र कुलकर्णी,डॉ गोपाळ बाहेती,प्रा दिनेश जोशी, प्रा शैलेश सूर्यवंशी तसेच कार्यालयीन कर्मचारी शिंदे,आदमाणे ,कोळीआदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की,” काँग्रेसच्या 1938 आणि 1939 च्या अधिवेशनामध्ये गांधीजी पुरस्कृत उमेदवाराला पराभूत करून ते दोन वेळेस काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यानंतर त्याचे गांधीजींशी झालेल्या मतभेदांमुळे काँग्रेसचा राजीनामा देऊन आपला वेगळा मार्ग निवडला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रासबिहारी बोस यांच्यासोबत आझाद हिंद सेनेची स्थापना सिंगापूर येथे केली. त्यानंतर आझाद हिंद सरकार, भारताची रिझर्व बँक,आजाद हिंद फौज यांची स्थापना करून जगातल्या दहा देशांची मान्यताही त्यांनी मिळवली होती. हिटलर आणि जपानची मदत घेऊन त्यावेळेस च्या ब्रिटिश शासित भारतावर ती आक्रमण केले. अंदमान-निकोबार आणि पूर्वीचे काही राज्य त्यांनी जिंकून घेतली आणि चलो दिल्ली असा नारा दिला त्यावेळेच्या तरुणांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा” हा नारा त्यांनी दिला होता. परंतु दुर्दैवाने अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अनुभवांमुळे जपानची आझाद हिंद सेनेची फौजीला होणारी मदत बंद झाली.या कारणाने आझाद हिंद सेनेचा पराभव झाला. आझाद हिंद सेनेच्या आव्हानाला प्रतिसाद देतात भारतीय नौदल आणि सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध बंड उभारले आणि त्यामुळेच ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे 1946 मध्ये मान्य केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड म्हणाले की,” नव्याने होत असलेले युद्ध स्मारक आणि त्या ठिकाणी उभी केली जाणारी नेताजींची मूर्ती ही खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली असणार आहे.तसेच हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे मराठी लोकांची मुलुख मैदानी तोफ होती. त्यांचे कार्य अतिशय अविस्मरणीय आहे.

शिवसेनाप्रमुख हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात .”एक प्रखर वक्ता प्रखर राष्ट्रभक्त प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेबांनी आपल्या लेखणी आणि वक्तृत्वाच्या जोरावर ती महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणामध्ये ठसा उमटवलेला आहे. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्राच्या सत्ता कारणांमध्ये आपल्या पक्षाचा प्रमुख पक्ष प्रवेश घडवून आणला आणि त्या काळामध्ये मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना, झुणका-भाकर केंद्र,वृद्ध लोकांना एसटी महामंडळतून अर्धे तिकीट अशी कामगिरी या सरकारच्या काळामध्ये झालेली होती” असे प्रतिपादन प्रा. विलास कोमवाड यांनी केले.

About The Author