हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

निलंगा (नाना अकडे) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अविनाश दादा रेशमे यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनेक महाविकास आघाडीचे नेतेमंडळी उपस्थित होते. त्यामध्ये काँग्रेसचे दयानंद चोपणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंडितराव धुमाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, ममाळे सर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, युवा सेनेचे दत्ता मोहोळकर, उमेश सातपुते प्रशांत वांजरवाडे, प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, प्रसाद मठपती आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!