लातूर जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या नूतन तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली घोषणा
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री पालकमंत्री अमित देशमुख, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा काँग्रेसच्या लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकुर, उदगीर, अहमदपूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट, तालुका अध्यक्ष व निलंगा शहरं अध्यक्ष यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेस सरचिटणीस यांनी लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांना पत्राद्वारे कळवले आहे.
त्या नुसार प्रदेश काँग्रेस कमिटीने लातूर जिल्ह्यातील १० तालुका अध्यक्ष व निलंगा शहरं अध्यक्ष अशा ११ ठिकाणी नूतन पदाधिकारी यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली असून त्या खालील प्रमाणे आहेत जिल्यातील तालुका व अध्यक्ष पुढीप्रमाणे आहेत.
(१.) लातूर तालुका – सुभाष घोडके,
२.औसा – दत्तोपंत सूर्यवंशी
३.रेणापूर – अँड प्रमोद जाधव
४.चाकुर – विलास पाटील
५.देवणी – अजित बेळकोने
६.अहमदपूर – अँड हेमंतपाटील
७.जळकोट – मारोती पांडे
८.निलंगा – विजयकुमार पाटील
९.उदगीर – कल्याण पाटील
१०निलंगा शहरं – गोविंद शिंगाडे
११.शिरूरअनंतपाळ आबासाहेब पाटील उजेडकर यांची नियुक्ती प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे.
जिह्यातील नवनिर्वचित नूतन सर्व तालुका कॉंग्रेस अध्यक्ष व शहरं अध्यक्ष यांचे भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर, राज्याचे वैधकिय शिक्षण मंत्री लातूर जिल्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.