सावकारीच्या त्रासाला कंटाळून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील तिघांची आत्महत्या
सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेळंकी येथे निवृत्त पोलिस कर्मचारी अण्णासाहेब गुरुसिद्ध गव्हाणे (वय 65) त्यांच्या पत्नी मालती (वय 55) व मुलगा महेश (वय 28) या तिघांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याने या घटनेने मिरज तालुका हादरून गेला आहे.
अण्णासाहेब गव्हाणे हे सांगली पोलिस दलातून निवृत्त झालेले होते निवृत्तीनंतर पत्नी मालती व मुलगा महेश यांच्यासह ते बेळंकी या त्यांच्या मूळ गावी राहायला गेले होते. महेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. महेश हा शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवूनूक करत होता या कारणाने त्याने काही खाजगी सावकारांकडून कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. सावकारी कर्जाची रक्कम सुमारे कोटीच्या घरात असल्याचीही चर्चा आहे या सावकारी वसुलीसाठी सावकारांनी तगादा लावला होता. आर्थिक अडचणीतून गव्हाणे यांनी जमीन, घर व प्लॉट विकले असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली मात्र त्यानंतरही गव्हाणे यांचे सावकारी कर्ज शिल्लक होते. गव्हाणे यांनी पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केली यावेळी पोलिसांना या ठिकाणी 2 चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत त्यात काही जणांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांच्या त्रासाने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये मिळालेले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी चिठ्ठीतील मुद्द्याच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. गव्हाणे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती मिरज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली याप्रकरणी मयत अण्णासाहेब गव्हाणे यांचा पुतण्या राकेश गव्हाणे यांनी मिरज पोलीस ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. 22 टक्के व्याजदराने बेकायदेशीररित्या पैशाच्या वसुलीसाठी दमदाटी करून मानसिक व शारीरिक त्रास दिला व आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. तिघांच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाईक यांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. एकच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी लिमिटेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.