सिलिंडरमधून गॅस चोरीप्रकरणी बेड्या
पिंपरी (प्रकाश इगवे) : घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून लहान टाक्यांमध्ये बेकायदा व धोकादायकरीत्या गॅस काढून त्याची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौघांना अटक केली असून जागा मालकाच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी म्हाळुंगे येथे शनिवारी कारवाई केली. विशाल मोहन खुरुद (वय २१, रा. बालेवाडी), रघुवीर वसंत काळे (वय २३, रा. बालेवाडी), अर्जुन दत्तात्रय बिरादार (वय ३१, रा. बालेवाडी), संग्राम विश्वनाथ पंढारे (रा. बालेवाडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह जागा मालक जीवन पाडळे (रा. म्हाळुंगे) याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
