मुलीसह तिच्या आईला बलात्काराची धमकी

मुलीसह तिच्या आईला बलात्काराची धमकी

बनावट फेसबुक खाते उघडून बदनामी

पिंपरी (रफिक शेख) : सात वर्षीय मुलीवर तसेच तिच्या आईवर बलात्कार करण्याची धमकी दिली. तसेच पती-पत्नीचे बनावट फेसबुक खाते उघडून त्यावर मेसेज पाठवून बदनामी केली. निगडी तसेच कल्याण वेस्ट, जि. ठाणे येथे जून २०१७ ते १८ जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. अभिषेक आकाशकर (वय ३२, रा. श्रीरामनगर, उल्हासनगर, ठाणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या नातेवाईक महिलेसोबत फिर्यादीचे अनैतिक संबंध आहेत, असा गैरसमज करून घेऊन आरोपीने फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीला फोनवर वारंवार कॉल तसेच व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करून शिवीगाळ केली.

फिर्यादीच्या पत्नीवर व सात वर्षीय मुलीवर बलात्कार करेन, अशी धमकी दिली. अश्लील बोलून फिर्यादीच्या पत्नीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे संभाषणदेखील केले, फिर्यादीचे व फिर्यादीच्या पत्नीचे बनावट फेसबुक खाते उघडून त्यावर मेसेज पाठवून फिर्यादीची बदनामी केली, असे फिर्यादीत नमूद आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!