आयुक्तांच्या नावाने तीन नगरसेवकांकडे मागितले पैसे

आयुक्तांच्या नावाने तीन नगरसेवकांकडे मागितले पैसे

पिंपरी (रफिक शेख) : महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाचे बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट बनवून अनोळखी व्यक्तींनी नगरसेवकांकडे आर्थिक मदतीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिका भवन येथे हा प्रकार १७ ते १८ जानेवारी २०२२ या कालावधीत घडला.

नीलकंठ धोंडीराम पोमण (वय ५४, रा. चिंचवड) यांनी शनिवारी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपरी – पालिकेचे आयुक्त राजेश प्रभाकर पाटील यांच्या व्हॉट्सअॅप प्रोफाइलचा फोटो वापरून खोटे व्हॉट्सअॅप प्रोफाइल बनवले. त्याद्वारे संतोष जाधव यांच्याशी आरोपींनी चॅटिंग केले. नगरसेवक अजित गव्हाणे, अंबरनाथ कांबळे, लक्ष्मण सस्ते यांना व्हॉट्सअॅप कॉल केला. त्यावर पालिका आयुक्तांचा हुबेहूब आवाज काढून अमेझॉन गिफ्ट कार्डद्वारे आर्थिक मदतीची मागणी केली.

About The Author

error: Content is protected !!