चुना पाहिजे म्हणून घरात आला अन् विनयभंग केला

चुना पाहिजे म्हणून घरात आला अन् विनयभंग केला

पिंपरी (प्रकाश इगवे) : तंबाखूला चुना पाहिजे, असा बहाणा करून घरात घुसलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मोरेवस्ती, चिखली येथे सोमवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. पीडित १५ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी मंगळवारी (दि. १८) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अविनाश वाघमारे (वय ३०, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तंबाखूला चुना पाहिजे, असा बहाणा करून आरोपी फिर्यादीच्या घरात आला. घरात फिर्यादीची १५ वर्षीय मुलगी होती. आरोपीने फिर्यादीच्या मुलीसोबत गैरवर्तन केले. तसेच धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

About The Author

error: Content is protected !!