पुण्यात तडीपार गुंडांची दादागिरी; चायनीज स्टॉलचालकाकडून उखळली खंडणी

पुण्यात तडीपार गुंडांची दादागिरी; चायनीज स्टॉलचालकाकडून उखळली खंडणी

पुणे (प्रकाश इगवे) : तडीपार असताना आपल्या साथीदारांमार्फत चायनीज स्टॉल चालकाला धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघा गुंडांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. शकील शब्बीर शेख (वय २३) आणि समीर शब्बीर शेख (वय २७, दोघे रा.लोहगाव) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत टिंगरेनगर येथील एका २७ वर्षांच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विमाननगरमधील गणपती चौकात चायनीजची गाडी लावतात. फिर्यादी व त्यांचे २ कामगार चायनीज स्टॉलवर असताना ७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता शकील शेख तेथे आला. त्याने फिर्यादी यांना “आपको समीर भाईने बोला था ना, चायनीज का स्टॉल चलाने का है, तो महिने का १० हजार रुपये देना पड़ेगा, ये ले समीर भाई से बात कर,” असे म्हणून फोन लावून फिर्यादीकडे दिला. त्यावर समीर शेख याने “तुला स्टॉल चालवायचा असेल, महिना १० हजार रुपये द्यावे लागेल,” अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरून शकील शेख याला १,२०० रुपये काढून दिले.

About The Author