कोरोनामुळे शिक्षणाचे झालेले नुकसान भरुन काढणे अशक्य

कोरोनामुळे शिक्षणाचे झालेले नुकसान भरुन काढणे अशक्य

15 ते 18 वर्ष वयोगाटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण आवश्यक – आ. विक्रम काळे

अहमदपुर (गोविंद काळे) : मागिल दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे शिक्षणाचे खुप मोठे नुकसान झालेले आहे आणि झालेले हे नुकसान भरुन काढणे शक्य नाही यासाठी 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन नियमाधिन राहुन शाळा, महाविद्यालये चालू राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.

ते अहमदपुर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे सिनेट सदस्य डॉ. मोटे सर, परिसरातील रक्तसंकलन चळवळीचे प्रणेते उमाकांत कासनाळे आप्पा, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे कपिल बिरादार सर, प्रा. मारोती बुद्रुक पाटील, ज्ञानोबा जाधव, प्रा. पुरुषोत्तम माने, डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. सतिष ससाने, रामेश्वर करंजकर, गवळे सर, पाटील सर, कदम सर आदींची उपस्थिती होती. शिक्षक आ. विक्रम काळे याचा उमाकांत कासनाळे आप्पा, प्रा. चंद्रशेखर शेटकार, नगर सेवक अभय मिरकले, नगर सेवक रविदादा महाजन, नगरसेवक संदिप चौधरी, कपिल बिरादार, प्रा. धिरज शेटकार, कमलकारजी नळेगावकर यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना आ. विक्रम काळे म्हणाले की, कोरोना काळामध्ये, लॉकडॉउनमध्ये मंत्रीमहोदयासोबत विविध बैठका घेवून कमिटी स्थापन करण्याची विनंती केली. प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांसदर्भात दोन ऑनलाईन बैठका पण घेतल्या. परंतु पुन्हा कोराना सुरु झाला आणि मध्यंतरीच्या काळातऑफलाईन बैठक घेण्यात आली. यामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. पीएच.डी. इंक्रिमेंट, ड्यूडेट, कॅशचा विषय, 12 रजेचा प्रश्न, जुनी पेन्शन लागु करणे, संचमान्यता, विनाअनुदानित साठी अनुदान, वैद्यकीय द्येयक,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण मोफत मिळाले पाहिजे इत्यादी अनेक प्रश्न येणाऱ्या काळात शासनासमोर मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे असा विश्वास त्यांनी यावेळी दिला . इतर क्षेत्राचे नुकसान भरुन निघु शकेल परंतु कोरोनामुळे झालेले हे शिक्षणाचे हे नुकसान भरुन काढण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. जो पहिलेमध्ये कधीच आला नाही तो दुसरीमध्ये येवून बसला आहे. जो दुसरीमध्ये आलाच नाही तो तिसरेमध्ये त्याला घालण्याची वेळ आलेली आहे. यासाठी लसीकरणावर जोर देवून 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. आणि नियमाच्या आधिन राहुन सुरळीतपणे शाळा, महाविद्यालये सुरु करणे गरजेचे आहे असेही ते शेवटी म्हणाले.

तसेच यावेळी यशवंत ज्युनिअर कॉलेज चे प्रा.डॉ. कारामुंगीकर बालाजी गोविंदराव यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. पदवी बहाल झाल्याबद्दल तसेच महात्मा फुले विद्यालयातील शिक्षक पुरुषोत्तम माने यांच्या वाढदिवसानिमित्त दोघांचा आ. विक्रम काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्राध्यापकांच्या विविध प्रश्नाबाबत डॉ. बब्रूवान मोरे यांनी आपल्या मनोगतातुन मांडणी केली. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कपिल बिरादार यांनी केले तर उपस्थितांचे आभार उमाकांत कासनाळे आप्पा यांनी यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक, कार्यकर्ते कोरोनाचे नियम पाळुन उपस्थित होते.

About The Author