केंद्रेवाडी येथे भगवान बाबा यांची जयंती साजरी

केंद्रेवाडी येथे भगवान बाबा यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथे माजी सभापती सौ आयोध्या ताई अशोकराव केंद्रे जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पंचायत समितीचे इंजिनिअर फुलारी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते माधव केंद्रे यांनी भगवान बाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी त्यांनी भगवान बाबा त्यांचा संदेश म्हणून एकर विका पण शाळा शिका असा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळूभाऊ केंद्रे यांनी केले गावचे सरपंच ज्योती माधव केंद्रे उपसरपंच सौ ज्योती बालाजी केंद्रे ग्रामसेवक मोहन केंद्रे ग्रामपंचायत सदस्य बाळू केंद्रे इंद्रायणीबाई केंद्रे भानदास केंद्रे पुष्पा केंद्रे भानुदास केंद्रे तुकाराम केंद्रे ग्रामपंचायत सेवक सुधाकर केंद्रे पोलीस पाटील चंद्रकांत केंद्रे एसटी चालक गोविंद केंद्रे रोजगार सहाय्यक रावसाहेब केंद्रे सुधाकर केंद्रे आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!