विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक होऊन देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा – गणेश हाके

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक होऊन देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा - गणेश हाके

अकरा विद्यार्थी उत्तीर्ण तर एक विद्यार्थी पुढील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र

अहमदपूर (गोविंद काळे) : या विज्ञानाच्या युगात देशाला वैज्ञानिकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक होऊन देशाच्या विकासासाठी हातभार लावावा असे आवाहन गणेश दादा हाके यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयातील डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी केले. नोव्हेंबर 2021मध्ये घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत नैतिक ज्ञानोबा उगिले या विद्यार्थ्यांची पुढील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे तर स्वराज अरुण तिडके, ऋतुजा शिवाजी ढाकणे, प्रांजल सचिन मुसणे, पृथ्वीराज परमेश्वर तिडके, दानिश रफीयोद्दीन मुंजेवार, शरयू शिवानंद मंगनाळे, विश्वजीत कपिलेश्वर ढोले ,उत्कर्षा प्रफुल धामणगावकर, बालाजी ज्ञानोबा चंदेवाड, अनुष्का तुकाराम हांडे,सिध्दी शिवकुमार खेडकर या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना शबाना शेख व सविता पाटील यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे-हाके, मुख्याध्यापिका आशा रोडगे-तत्तापुरे मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार संगीता आबंदे यांनी मानले.

About The Author