अहमदपूरात ‘सीएनजी’ चा सेवारंभ

अहमदपूरात 'सीएनजी' चा सेवारंभ

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील तात्या पेट्रोल पंपावर नव्यानेच सुरू झालेल्या सीएनजी गॅस सेवेचा सेवारंभ माजी राज्यमंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे उपस्थित होते. तर विशेष उपस्थितीमध्ये माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, आशोका गॅसचे प्रमुख अधिकारी महेश बिलीगुडी, व्यवस्थापक स्वप्नील गुरव, आशोका गॅसचे विक्री अधिकारी वसंत कुमार, रोहीत बाहेती, एचपीसीएलचे विभागीय अधिकारी सॅम्युअल रत्नस्वामी, एचपीसीएलचे विक्री अधिकारी कल्पेश मौर्या, राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांबजी महाजन, कृउबासचे सभापती शिवानंद हेंगणे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रा.पी.टी.पवार, परिमल लातूर चे बाबुराव जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेसचे तालुकाप्रमुख हेमंत पाटील, माजी तालुकाप्रमुख डॉ. गणेश कदम, जि.प. सदस्य माधवराव जाधव, माजी उपनगराध्यक्ष दिलीपराव पाटील, गोविंदराव गिरी, अमितभैय्या रेड्डी, युवक नेते डॉ.सिध्दार्थकुमार सुर्यवंशी, प्राचार्य व्यंकटराव मुळके, प्रभाकराव कावळे (उमरगा ), सुधाकरराव माने, मोहीब कादरी, प्रा.दत्ताभाऊ गलाले, ज्ञानोबा भोसले, डॉ.सतिश पेड, आशोक चापटे, ईश्वर जोगदंड, नानाभाऊ कदम, एन.डी. राठोड, दत्तात्रय जाधव, प्रशांत जाभाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ बाजिराव निपाणकर, भांडार प्रमुख सागर गव्हाणे, गुत्तेदार किरण पारवे, प्रदीप फुलसे, प्रा. गोविंद शिळे, सर्व पत्रकार बांधव,, सुमनबाई शेळके, ज्योतीताई कावळे, सीएनजीच्या प्रोपा. वर्षाताई शेळके आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी उद्घाटन पर मनोगत व्यक्त करतेवेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, अहमदपूर सारख्या ग्रामीण भागात ही सेवा उपलब्ध झाल्याने वाहनधारकाची मोठी इंधन खर्चावरील बचत झाली आहे. तर अध्यक्षीय मनोगतात माजी मंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता छोटया- मोठ्या व्यवसायाकडे उतरले पाहीजे. तसेच यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, दिलीपराव देशमुख यांची समायोचित भाषणे झाली. याप्रसंगी राजू खंदाडे यांच्या सीएनजी गाडीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब जाधव व माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते पहिल्या गाडीत सीएनजी भरण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोविंदराव शेळके यांनी, सुत्रसंचलन पुरुषोत्तम माने यांनी तर आभार इंजि.केतकी कावळे पाटील यांनी मानले. यावेळी माजी सरपंच गोपाळ पाटील, मनोरथ ( पिंटू ) पाटील, विरेंद्र पवार, विलास सुर्यवंशी, कैलास सुर्यवंशी, प्रतिक पाटील, सौरभ पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

About The Author