पार्किंगमधून चोरट्यांनी पळवली दुचाकी

पार्किंगमधून चोरट्यांनी पळवली दुचाकी

पिंपरी (रफिक शेख) : सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाहूनगर, चिंचवड येथे २१ ते २३ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. प्रशांत सहादू आल्हाट (वय २७, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २३) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने त्यांची दुचाकी राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी (दि. २१) सकाळी नऊच्या सुमारास पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हां प्रकार रविवारी (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला.

About The Author

error: Content is protected !!