पाणी भरण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी

पाणी भरण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी

पिंपरी (रफिक शेख) : पाणी भरण्याच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. बौद्ध नगर, पिंपरी येथे शनिवारी (दि. २२) ही घटना घडली. याप्रकरणी रविवारी (दि. २३) पिंपरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात | गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष कुंडलिक घोडके (वय ४३, रा. बौद्ध नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सत्यशोधक अशोक कांबळे ((४०), प्रतीक संगमेश्वर साबळे (२३), यश अशोक सूर्यवंशी (२१), आयुष सुमित “कांबळे (२२, सर्व रा. बौद्ध नगर, पिंपरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची बहीण आणि आरोपी सत्यशोधक कांबळे यांच्यात पाणी भरण्यावरून वाद झाला. तो वाद सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपींनी सिमेंटचा गट्ठ मारून फिर्यादीला जखमी केले. तसेच फिर्यादीचा भाचा अक्षय व अनिकेत यांनाही आरोपींनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या बहिणीचा हात पिरगळून तिला शिवीगाळ केली. तुम्ही यापुढे या बिल्डिंगमध्ये कसे राहता तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकीही आरोपींनी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. याच्या परस्पर विरोधात सत्यशोधक शिवमूर्ती कांबळे (३४, रा. बौद्ध नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार किरण पंडित फडतरे (५०), अक्षय फडतरे (२६), अनिकेत फडतरे (२४), संतोष (३५, सर्व रा. बौद्ध नगर, पिंपरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादीचा भाचा गल्लीमध्ये उभा असल्याच्या कारणावरून त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादीने समजावून सांगितले असता आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

About The Author

error: Content is protected !!