बालकांच्या वरील लैंगिक अत्याचार थांबवा
विद्यार्थी, शिक्षक, पालक यानी पोक्सोच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा…
जिल्हा व सत्र न्यायाधीश संभाजीराव ठाकरे यांचे प्रतिपादन.
अहमदपूर (गोविंद काळे) : सद्यस्थितीला मुला-मुलींच्या छेडछाड आणि ईतर गुन्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढ झाली असल्याचे सांगून विद्यार्थी शिक्षक पालकांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सौरक्षण कायद्याचे नियम कडकपणे पाळा असे जाहीर आव्हान जिल्हा व सत्र न्यायाधीश संभाजीराव ठाकरे यांनी केले. ते दिनांक 27 रोजी यशवंत विद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्यावतीने आयोजित बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा आणि वाहतुकीचे नियम रस्ता, सुरक्षा कायदा सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे गुरुजी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर पी .ए. सवदीकर, दिवानी न्यायाधीश आशिष साबळे, दिवाणी न्यायाधीश सी एस तोंडचीरे, पी एस आय प्रभाकर अंनदोरीकर, प्राचार्य व्ही व्ही गंपले,सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले म्हणाली की, कोविंड पेक्षाही जास्तीचे मृत्यू अपघातात होत असल्याचे सांगून पालक विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमाचे पालन करावे असे जाहीर आवाहन केले. अध्यक्षीय समारोप डी बी लोहारे गुरुजी यांनी केला. प्रास्ताविक न्यायाधीश आशिष साबळे यांनी सूत्रसंचालन रामलिंग तत्तापुरे यांनी पाहुण्यांचा परिचय राजकुमार पाटील यांनी तर आभार के.डी. बिराजदार यांनी मानले कार्यक्रमाचा शुभारंभ न्याय गीताने करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले ,दिलीप गुळवे, कनिष्ठ लिपिक विकास कराड, परशुराम जाधव ,सह विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षणप्रेमी नागरिक कोवीड चे नियम पाळून उपस्थित होते.