विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा – प्राचार्य रेखाताई तरडे

विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा - प्राचार्य रेखाताई तरडे

अहमदपूर (गोविंद काळे) : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच शालेय अभ्यासासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा असे आवाहन प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयात श्रेया IAS स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी केले.ज्ञानेश्वरी सूर्यवंशी राज्यात दुसरी, सोनल भालेराव व माही पन्हाळे राज्यात चौथी, वैभवी फुलमंटे राज्यात सहावी, समर्थ महारुद्र आलापुरे ,कबीर धामणगावकर, देवेंद्र लोहकरे व श्रेया पवार राज्यात पाचवी, सृष्टी सूर्यवंशी व आर्यन आरदवाड राज्यात सातवा, मोहम्मद नोमान शेख राज्यात नववा, अपूर्वा गुरुमे, अमृता यरबले व सोहम लक्ष्मण फुलारी राज्यात दहावा, मोहम्मद अल्तमश शेख व ओमकार कज्जेवाड राज्यात अकरावा, गार्गी नाळेगावकर राज्यात चौदावी, श्रावणी हरिदास भंडे राज्यात पंधरावी आदी विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत येऊन यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना अश्विनी घोगरे व शारदा तिरुके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस बालाजी रेड्डी मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे, श्रीराम आरदवाड, महारुद्र आलापुरे, संजय कज्जेवाड सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा रोडगे-तत्तापुरे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले. आभार मीना तोवर यांनी मानले.

About The Author