अहमदपूर- शिरूर ताजबंद रोड भिषण अपघात; दोघे जण जागीच ठार

अहमदपूर- शिरूर ताजबंद रोड भिषण अपघात; दोघे जण जागीच ठार

अहमदपूर (गोविंद काळे) : शिरूर ताजबंद राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ रोड वर थोरलेवाडी पाटी जवळ चार चाकी वाहन मारूती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर व होन्डा कंपनीची शाईन मोटर सायकलची समोरा समोर धडक लागुन झालेल्या भिषण अपघातात मोटार सायकल वरील शिरुर ताजबंद येथील दोन युवक जागीच ठार झाले असुन अहमदपूर पोलीसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर- शिरूर ताजबंद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ रोड वर शहरापासुन जवळ असलेल्या थोरलेवाडी पाटी जवळ अहमदपूर कडून लातुरकडे भरधाव वेगाने जाणारी चार चाकी वाहन मारूती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम.एच २४ ए डब्लु ५३६९ व शिरुर तांजबद कडून अहमदपूरकडे भरधाव वेगाने येणारी होन्डा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक एम.एच २४ बि.एच ८२८० ची दि २७ जानेवारी रोजी वार गुरूवारी दुपारी अंदाजे ०१: १५ वाजता समोरा समोर जोराची धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात मोटार सायकल वरील शिरूर ताजबंद येथील रामेश्वर राजेंद्र चव्हाण वय २४ वर्ष व मेघवर्धन ऊर्फ उत्तम ज्ञानोबा डोंगरे वय २५ वर्ष हे दोन युवक जागीच ठार झाले असुन मोटार सायकलचा अक्षर:शहा चेंदामेंदा झाला आहे तसेच चार चाकी वाहनाच्या ड्रायव्हरला सुध्दा गंभीर दुखापत झाल्यामुळे घटनास्थळावर उपस्थित असलेल्या व्यंक्तींनी उपचाराठी तात्काळ लातुर येथे पाठवुन दिले दोन्ही मृत देहाचे शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असुन मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधिन करण्यात आले. सदरील घटनेची अहमदपूर पोलीसांत अपघाताची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोह व्हि.बी दिंडगे व पोना बि.टि साळवे हे करीत आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!