स्त्रीशक्तीचे मूर्तिमंत प्रतीक इंदिरा गांधी – डॉ. प्रकाश चौकटे

स्त्रीशक्तीचे मूर्तिमंत प्रतीक इंदिरा गांधी - डॉ. प्रकाश चौकटे

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा काळ आणि त्या काळात भारतालाच नव्हे तर जगाला स्त्रीशक्ती काय असते हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले. म्हणूनच इंदिरा गांधींना स्त्री शक्तीचं प्रतिक मानले जाते असे प्रतिपादन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कन्या दिवसांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रकाश चौकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी स्त्री असून ही पुरूषांना लाजवेल अशी कामगीरी केली. भारताची खरी शक्ती जगाला दाखवून दिली, असे ही ते म्हणाले . या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ रोजी प्रथम महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली या दिवसाचे औचित्य साधून २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ. प्रशांत बिरादार यांनी तसेच आभार प्रो. डॉ. नागराज मुळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी ‘कोविड- १९’ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.

About The Author