लातूर जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या पहिल्या अडीच वर्षासाठी अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या पहिल्या अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदासाठीची सोडत आज जाहीर करण्यात आली. नगरपंचायत शिरुर अनंतपाळ अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला, नगर पंचायत चाकूर अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण, नगर पंचायत देवणी अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती, नगर पंचायत जळकोट अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला, नगर पंचायत रेणापूर अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आहे.
राज्यातील 139 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत मंत्रालय मुंबईतुन प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. सद्यस्थितीत कोविड-19 च्या संक्रमणामुळे आरोग्य विषयक निकष विचारात घेता या सोडतीसाठी संबंधित अधिकारी/लोक प्रतिनिधींनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित सोडतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दहा लोक प्रतिनिधींना सोबत घेऊन ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.