प्रजासत्ताक दिनानिमित्त सह्याद्री युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीरात 142 जणांचे रक्तदान

प्रजासत्ताक दिनानिमित्त सह्याद्री युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीरात 142 जणांचे रक्तदान

अहमदपूर (गोविंद काळे) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येथील सह्याद्री युवा मंचच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर शिबीराच्या अध्यक्षस्थानी अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अयोध्याताई केंद्रे होत्या. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोरील प्रांगणात सह्याद्री युवा मंचच्या वतीने रक्त दान शिबिर घेण्यात आले.सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते सदरील रक्त दान शिबिराचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अयोध्याताई केंद्रे, सभापती गंगासागर जाभाडे, माजी उपसभापती निळकंठ पाटील,एम बी वाघमारे,डॉ श्रीरंग खिल्लारे,राजकुमार खंदाडे, गोविंद गिरी,डॉ सिद्धार्थ सूर्यवंशी,रामभाऊ बेल्लाळे,निखिल कासनाळे,रवी महाजन,संदीप चौधरी,लक्ष्मण अलगुले, सय्यद साहिदभाई,देवानंद मुळे, मेघराज गायकवाड,अभय मिरकले, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.तर शहरातील सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबीरास भेटी देऊन सह्याद्री युवा मंचच्या पदाधिकार्यांचे कौतुक केले.

सदरील रक्त दान शिबिर यशस्वी करण्यासाठी मनोज मुन्ना कांबळे,लखन गायकवाड, विशाल तांदळे,ओमप्रकाश गुट्टे,आषुतोष कारामुंगे, कृष्णा रोकडे,धनंजय कांबळे,प्रविण कसादे ,रोहन जाधव, धनंजय कांबळे, सुधीर कांबळे,धम्मपाल परतवाघ,सागर तेलंग, रमेश कांबळे,संतोष गायकवाड,संघरक्षित ढवळे,,शंकर गडमे, आदित्य गुळवे, समाधान गायकवाड,विकास बार्शेकर यांच्या सह सह्याद्री युवा मंचच्या पदाधिकार्यांनी परीश्रम घेतले.

About The Author