प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपच्या वतीने 75 माजी सैनिकांचा सत्कार

प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपच्या वतीने 75 माजी सैनिकांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारत देशाची सेवा करुन सेवा निवृत्त अशा अहमदपूर तालुक्यातील 75 माजी सैनिकांचा सत्कार माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. अहमदपूर शहरातील नांदेड ते लातूर हायवे वरील अमित रेड्डी यांच्या निवासस्थानातील भव्य प्रांगणात ध्वजारोहण करून माजी सैनिकांचा गौरव करुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी सभापती आर.डी.शेळके, सभापती गंगासागर जाभाडे,जयश्री केन्द्रे, अमित रेड्डी,देवानंद मुळे, निळकंठ पाटील,शिवराज पाटील, राजकुमार खंदाडे, रामभाऊ बेल्लाळे, गोविंदराव गिरी, चंद्रशेखर डांगे, राहुल शिवपुजे,इतिराज केंद्रे, रामभाऊ नरवटे,माणीक नरवटे,लक्ष्मण खंदाडे, बबलू पठाण, नागेश भुतडा,अतुल रेड्डी,संगम कुमदळे, यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोवीडचे सर्व नियम पाळुन उपस्थित होते.

About The Author