तू काळी आहेस, तुला होणारी मुले ही तुझ्यासारखीच होतील असे म्हणत विवाहितेचा छळ

तू काळी आहेस, तुला होणारी मुले ही तुझ्यासारखीच होतील असे म्हणत विवाहितेचा छळ

पिंपरी (रफिक शेख) : “तू काळी आहेस. तुला होणारी मुले ही तुझ्यासारखीच होतील”, असे म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना १० डिसेंबर २०१७ ते २७ मार्च २०१८ या कालावधीत कासारवाडी येथे घडली. अमित श्याम क्षीरसागर (वय ३१), श्याम गोविंद क्षीरसागर (वय ५५) आणि तीन महिला आरोपी (सर्व रा. सरिता कुंज, कासारवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २८ वर्षीय विवाहितेने मंगळवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना त्यांनी माहेरहून पैसे तसेच गाडी घेण्यासाठी पैसे आणले नाहीत. फिर्यादी विवाहिता या काळ्या आहेत. तुला मूल झाले तर ते तुझ्यासारखीच होईल, असे टोचून बोलले. फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाणही केली.

About The Author

error: Content is protected !!