हेल्प चाहिये क्या म्हणत पादचारी तरुणीला लुटले

हेल्प चाहिये क्या म्हणत पादचारी तरुणीला लुटले

पिंपरी (रफिक शेख) : ‘आपको कुछ हेल्प चाहिये क्या?’ अशी विचारणा करत तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर काही अंतर जाऊन चोरटे परत तरुणीकडे आले. त्यांनी तरुणीचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी (दि.२५) पहाटे जगताप डेअरीजवळ घडली. याप्रकरणी जगताप डेअरी रहाटणी येथे राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. २५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला या खासगी आराम बसमधून उतरल्यावर जगताप अचानक झालेल्या या प्रकारामुळे फिर्यादी तरुणी ओरडली. पळून जात असलेले चोरटे पुन्हा त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले की, ‘तुम चिल्लाई क्यूँ, मैंने तुम्हारे इज्जत पे हात डाला क्या?’ असे म्हणून फिर्यादी यांच्या हातातील मोबाईलसह एकूण २५ हजार रुपयाचा ऐवज हिसकावून नेला.

डेअरी चौकाजवळ येत होत्या. त्या एमएसईबी कार्यालयाजवळ आल्या असता एका दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी तरुणीला ‘आपको कुछ हेल्प चाहिये क्या?’ अशी विचारणा केली. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर दुचाकीवरील एका चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली.

About The Author

error: Content is protected !!