तरुणाला बेल्टने अमानुष मारहाण

तरुणाला बेल्टने अमानुष मारहाण

पिंपरी (रफिक शेख) : भाई न म्हणाल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारासह त्याच्या चार साथीदारांनी तरुणाला कमरेचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. जमिनीवर बिस्किटे टाकून ती खाण्यास भाग पाडली. हा खळबळजनक प्रकार ‘थेरगावातील गणेशनगर येथे घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा संतापजनक प्रकार समोर आला. रोहन वाघमारे या सराइतासह प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. २० वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रोहन हा सराईत गुन्हेगार असून, त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारीची मुदत संपल्याने तो हद्दीत आला होता.

About The Author

error: Content is protected !!