यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथविधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथविधी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य शपथविधी कार्यक्रम पार पडला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मा. उप सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या आदेशान्वये महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला या वेळी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ज्ञानगंगा ‘ या भितीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसह सर्वांनी मतदार दिनानिमित्त सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूचसंचलन केंद्र संयोजक ह.भ.प. प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर आभार केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!