संत ज्ञानेश्वर विद्यालयात कायदेविषयक शिबिर संपन्न

संत ज्ञानेश्वर विद्यालयात कायदेविषयक शिबिर संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ संघ अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर विद्यालयात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा आणि वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते मा.गणेश दादा हाके होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश संभाजी ठाकरे दिवाणी न्यायाधीश पी. ए. सवदीकर, सहदिवाणी न्यायाधीश एस.जी. साबळे, एस. एस. तोंडचीरे, ए. ए.उत्पात, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोलीस केदार, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.हनुमंत देवकते, हेमंत गुट्टे, उध्दव शृंगारे,सह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कायदेविषयक गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश संभाजीराव ठाकरे यांनी बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची दक्षता याबाबतची सखोल माहिती दिली. तर पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा याविषयी मार्गदर्शन केले. गणेशदादा हाके यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. उत्पात यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले. आभार शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About The Author