कान्होपात्रा सखाराम क्षीरसागर यांना पीएच.डी. प्रदान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी कान्होपात्रा सखाराम क्षीरसागर यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ने सन्मानपूर्वक मानव्य विद्या शाखेची मराठी विषयात शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशी पीएच.डी. ( विद्यावाचस्पती ) ही पदवी प्रदान करण्यात आली. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, कान्होपात्रा क्षीरसागर यांनी परळी वैजनाथ येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. राजकुमार यल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ डॉ.शैला लोहिया यांच्या समग्र साहित्याचा विवेचक अभ्यास ‘ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या मानव्य विद्याशाखेत मराठी विषयातील शोधप्रबंध सादर केला होता. नूकतीच त्यांची आभासी पद्धतीने खुली मौखिकी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षक म्हणून प्रो. डॉ.मार्तंड कुलकर्णी हे उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. दासू वैद्य यांची उपस्थिती होती. यशस्वी मौखिकी परीक्षेनंतर कान्होपात्रा क्षीरसागर यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.