कारवाईतील वाळूने भरलेला ट्रक चोरीला

कारवाईतील वाळूने भरलेला ट्रक चोरीला

वाघोली (रफिक शेख) : लोणी कंद (ता. हवेली) वाहतूक विभागाने बकोरी येथे वाळूने भरलेला ट्रक पकडून कारवाईसाठी केसनंद फाटा येथे उभा केला केला असता वाहतूक पोलिसांच्या परवानगी शिवाय कारवाईतील ट्रक चोरून नेल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लोणी कंद वाहतूक विभागाचे विनायक येवले यांनी फिर्याद दिली आहे. या ट्रकबाबत कारवाईसाठी महसूल विभागाकडे रिपोर्ट पाठविण्यात आला होता. परंतु त्याआधीच सदरचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला. ट्रक दौंड-पाटस परिसरातील आहे. अधिक तपास लोणी कंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी कंद पोलीस करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!